देमणी शिवारातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर फोडला टाहो
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर) पावसाअभावी करपलेली पिके, भेगळलेली जमीन, कोणतेही उत्पन्न येणार नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी चिंता याचा प्रत्यक्ष अनुभव केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि.९) देमणी येथे पीक परिस्थितीच्या पाहणीत घेतला.
दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने देमणी येथे भेट दिली. शेतात काहीही उरले नाही, आता जगावे कसे?, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी पथकासमोर टाहो फोडला. पथकाने शेतकरी विलास शिंदे यांच्या शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी शिदि यांनी सांगितले, की, मशागत, बियाणे, खते, मजुरी यासाठी मोठा खर्च केला. चांगले उत्पन्न आले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असे वाटले होते.
मात्र, पावसाने पाठ फिरवली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. शेतात आता काही उरलेल नाही. आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करताना केंद्रीय पथकातील अधिकारी. जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला असे म्हणत त्यांचे डोळे पाणावले. दुष्काळाची ही भीषणता शिंदे यांच्या करपलेल्या स्वप्नात, आसवं सुकलेल्या डोळ्यांत दिसून आली.
पथकातील सदस्यांनी या ठिकाणी जमलेल्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि त्यांच्या अडचणींची अडचणीची माहिती माहिती घेतली.
-- शेकटा मंडळ फळबाग पीकविम्यापासून वंचित --
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी संवाद साधताना, मात्र शेकटा मंडळाला ट्रिगर मशीनमधील तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन तालुक्यातील इतर मंडळे फळबाग पीकविम्यासाठी पात्र ठरली. वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे पात्र फळबाग उत्पादक विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याची व्यथा त्यांनी मांडली. जिल्ह्यातील फळबाग उत्पादक विमा आणि दुष्काळी मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.
-- गोठ्यावरच चारा-पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी --
दुष्काळामुळे जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही. वारा छावण्यांमध्ये दुभत्या जनावरांची योग्य देखभाल होत नसल्याने, पशुधनाची नोंद घेऊन अनुदान द्यावे किंवा गोठ्यावरच चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.















